अमळनेर: शहरातील बस स्थानक मागील भागातील शिरूड नाका परिसरातील एका तरुणीने शुल्लक कारणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची खडबडजणक घटना दि १० रोजी सायंकाळी समोर आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, शिरूड नाका परिसरात राहाणाऱ्या २० वर्षीय मानसी भास्कर माळी ही विद्यार्थिनी प्रताप महाविद्यालयात बी.कॉम च्या दुसऱ्या वर्षाला होती. तिला बी. कॉम च्या तिसऱ्या वर्षाला प्रवेश मिळाला नाही. म्हणून तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना दि १० रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.

