प्रतिनिधी: अमळनेर नगरपरिषद दिव्यांग निधी वाटपात हरलगर्जी पणा करून तत्कालीन मुख्याधिकारी यांनी घोळ केल्याप्रकरणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई ची मागणी केली असता जिल्हाधिकारी जळगांव यांनी कोणतीही कारवाई न करता योगेश पवार यांना वरिष्ठ प्राधिकरण यांच्याकडे न्याय मागण्याचे पत्र दिले होते. दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी योगेश पवार यांनी थेट राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचाकडेस मंत्रालयात जाऊन तक्रार दिल्याने सदरील तक्रारींवर नगरविकास विभाग प्रधान सचिव यांनी दि.२९ नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडून सदर प्रकरणी नियमानुसार तपासणी /कार्यवाही करून, मुद्देनिहाय वस्तुनिष्ठ अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायसह शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

या बाबत योगेश पवार यांनी सतत पाठपुरावा केला असता जिल्हाधिकारी जळगांव यांनी सदरील मंत्रालयीन पत्राचा अवमान करून कोणताही अहवाल शासनास सादर केला नसल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले असता, नगरविकास विभाग -२ यांनी दि.२ सप्टेंबर २०२२ रोजी पुन्हा स्मरणपत्र देऊन अहवाल मागवण्यात आला आहे. तसेच दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी देखील सदर प्रकरणी दिव्यांग हक्क व पुनर्वसन कायदा २०१६ च्या कलम ८०,८२ अन्वये दखल घेतली असून या प्रकरणी जिल्हाधिकारी जळगांव, पोलीस निरिक्षक अमळनेर व मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर यांना नोटीस देत खुलासा मागविण्यात आला आहे. या तक्रार प्रकरणी ३ वर्ष उलटल्यानंतरही दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्याची जिद्द पाहत प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांचे दिव्यांग व सामाजिक क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे.


