अमळनेर:- धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथे पोळ्या दिवशी झालेल्या वादाला वेगळे वळण देऊन बौद्ध समाजाला मेहरगाव येथील काही समाज कंठकांनी सामूहिक बहिष्कार टाकला तसेच काही बौद्ध तरुणांना व महिलांना मारहाण करण्यात आली. यासंदर्भात संबंधितांवर सोनगीर पोलीसात ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे. असे असताना देखील सदर गुन्हातील आरोपींवर योग्य ती कार्यवाही करण्यात आली नाही.

या बाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) च्या वतीने अमळनेर प्रांाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दोषींची तात्काळ चौकशी होऊन त्यांच्यावर कडल शासन करुन फौजदारी स्वरूपात कार्यवाही करण्यात यावी. सदर आरोपींनी तात्काळ अटक करावी. यावेळी युवा ता.अध्यक्ष पंकज सोनवणे, समाज भूषण यशवंत बैसाने, शहराध्यक्ष अँड अभिजीत बिराडे, गोपाल पवार, राहुल वाडेकर, विनोद बिऱ्हाडे,पप्पू केदार, उत्तम नगराळे, संदिप नगराळे, किरण बच्छाव, प्रदीप मिलागीर,अजय गव्हाणे, मुन्ना सोनवणे इ.उपस्थित होते

