जळगाव (पोलीस वृत्त- मंथन साळुंके) जळगावात जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून खुनाची मालिका सलग सुरू आहे चौथ्या दिवशी तिसरा खून झाल्याने जळगाव पूर्णपणे हादरले आहे. रात्रीच्या सुमारास शहरातील निवृत्ती नगर परिसरात मध्यरात्री एक वाजेनंतर एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. भावेश उत्तम पाटील (वय २८, रा. आव्हानी) असे मयताचे नाव आहे.

भावेश उत्तम पाटील (वय-२८, रा.आव्हाणे, हल्ली मुक्काम निवृत्तीनगर) असे मयताचे नाव आहे. रात्री १ वाजेच्या सुमारास एसएमआयटी महाविद्यालयासमोरील १०० फुटी रस्त्यावर हा खून करण्यात आला. चाकूने सपासप वार केल्याने तरुण रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. खून करणारे संशयीत वाळूमाफिया असून वाळू व्यवसायाच्या वादातून खून झाल्याची कळते. मात्र, अद्याप खून कोणी केला व त्यामागील नेमकं कारण स्पष्ट झालेले नाही. भावेश हा वाळू व्यवसायात सक्रिय होता. त्याचे वडील आव्हाणे गावात राहतात तर भाऊ कपील हा सुरत येथे वास्तव्यास आहे. पत्नी व मुलीसह तो निवृत्ती नगरात राहत होता. धक्कादायक म्हणजे भावेशचा मृतदेह दोन वाजेपर्यंत घटनास्थळावरच पडून होता. माहिती कळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सलग चार दिवसांपासून या अशा खूनांच्या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात भिती चे वातावरण निर्माण झाले आहे.

