यावल पोलीस वृत्त – जळगाव जिल्हाधिकारी पुन्हा एक घटना समोर आली आहे जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चितोडा येथील 38 वर्षीय युवकाची चाकूने गळा चिरून तसेच चाकूचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्या. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या घडली असलीतरी खुनाचा प्रकार मात्र सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. मनोज संतोष भंगाळे (38, चितोडा, ता. यावल) असे मयत युवकाचे नाव आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास केला खून
चितोडा गावातील रहिवासी असलेल्या मनोज भंगाळे या युवकाचा मृतदेह चितोडा-डोंगरकठोरा रस्त्यावरील चंदूशेठ चौधरी यांच्या शेतात असल्याची माहिती सोमवारी सकाळी उघडकीस आली. यावल पोलिसांना याबाबतची माहिती कळवण्यात आल्यानंतर यावलचे पोलिस राकेश मानगावकर, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, गणेश ढाकणे, रोहिल गणेश, संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी व पोलिसांचा ताफा दाखल झाला.

