• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित “तरूणींची दहीहंडी”

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 18, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव पोलीस वृत्त दरवर्षाप्रमाणे यंदाही युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे शुक्रवार दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सायं 6 वाजेपासून तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. सदर आयोजनाचे हे 14 वे वर्ष असून यावर्षी मोठ्या प्रमाणात आयोजनाची तयारी सुरू आहे. डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मुलींचे गोविंदा पथक, शिवतांडव प्रतिष्ठान चे 130 वादकांचे ढोल पथक, हायटेक लाईटस, बालगोपालांसाठी श्रीकृष्ण वेषभूषा स्पर्धा, मल्लखांब चे थरारक प्रात्यक्षीक, सांस्कृतिक नृत्य आदी. या दहीहंडी महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक रित्या युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे एकमेव तरूणींच्या गोविंदा पथकाची दहीहंडी आयोजित करण्यात येते. दहीहंडी सारख्या उत्सवात महिलांना मुख्य प्रवाहात आणून उत्सवाचा आनंद द्विगुणीत करणे हे या आयोजनामागील युवाशक्ती फाऊंडेशचा उद्देश आहे. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, सिद्धीविनयक गणपती मंदिर न्यास चे कोषाध्यक्ष संजय सावंत, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, संदिप गवळी, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, डॉ. जी. डी. बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गौरी राणे, मुळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे, रामानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे, अनुभूती शाळेच्या संचालिका निशा जैन, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, सिद्धार्थ बाफना, अजय ललवाणी, प्रेम कोगटा, रजनिकांत कोठारी, पारस राका, प्रविण पगारीया, जळगांव जनता बँकेचे संचालक ललित चौधरी, सपन झुनझुनवाला, वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, डॉ. विकास बोरोले, डॉ. शितल ओसवाल, प्रितम रायसोनी, डॉ. प्रिती अग्रवाल, विद्या इंग्लीश मिडीयम शाळेच्या मुख्याध्यापिका कामिनी भट, विराफ पेसुना, अखिल तिलकपुरे, प्रतिक पलोड यासह शहरातील 10 उद्यमशील महिला उपस्थित राहणार आहेत. युवाशक्ती फाऊंडेशनचे 150 स्वयंसेवक विशेष गणवेशात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेणार आहेत. कोरोना काळानंतर प्रथमच शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात उत्सवाचे आयोजन होत आहे. तरी जास्तीतजास्त जळगावकर नागरिकांनी या आयोजनात सहभागी व्हावे असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीय व सचिव अमित जगताप यांनी केले आहे.

Previous Post

अग्निवीर भरतीत धावताना अस घडलं! तरुणाला मृत्यूने गाठल…

Next Post

महत्त्वाची बातमी! दहीहंडीवेळी दुखापत झाल्यास गोविंदावर मोफत उपचार होणार

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

महत्त्वाची बातमी! दहीहंडीवेळी दुखापत झाल्यास गोविंदावर मोफत उपचार होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!