पोलीस वृत्त:- पुण्याकडून मुंबईकडे येत असताना पळस्पे हद्दीत मडप बोगद्यापासून 16 किमी अंतरावर शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व मराठा महासंघाचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.

या अपघातात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. सुरक्षा रक्षक, चालक हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंळबोली एमजीएम रूग्णालयात येऊन वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली(MGM came to the hospital and discussed with the medical officer) या अपघाताची संपुर्ण चौकशी होईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाचे ते नेते होते. आरक्षणाबाबत त्यांनी मुद्दे उपस्थित केले. त्यांच्या कुटुंबातील सदस्य मुंबईकडे निघाले असून, त्यांना जी काही मदत, व्यवस्था लागेल ती करण्यात येईल असे सांगितले. एमजीएम रूग्णालयात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा समाजाचे नेते आबा पाटील देखील रूग्णालयात आले. त्यांनी ही हा अपघात आहे की घातपात असा प्रश्न उपस्थित केला.
(The government should conduct a thorough investigation into the matter)
सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. या अपघातात समाजासाठी लढणारा नेता गमवल्याचे त्यांनी म्हटले. आता तरी सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊन मेटेंना श्रध्दांजली अर्पण करावी, असे म्हटले. पाटील यांनी यावेळी अपघात झाल्यानंतर अर्धा तास रुग्णवाहिका घटनास्थळी आली नसल्याची माहिती दिली.

