जळगाव पोलीस वृत्त – पाचोरा म्हसावद येथील इंग्लिश मेडीयम शाळेत चौथीच्या वर्गात शिकणारा दहिगाव (संत) ता. पाचोरा येथे राहत असलेल्या या लहान बालकाने स्व:ताच्या घरात आई – वडील घरी नसतान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
याबाबत सविस्तर की, दहिगाव (संत) ता. पाचोरा येथील गौरव प्रविण पाटील (वय – ११) याने राहत्या घरी घराच्या पहिल्या टप्प्यात छताला दोरी बांधून घरातील दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. वडील प्रविण नथ्थू पाटील हे सहपत्नीक नाशिक येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेलेले असताना घरी ही दुदैवी घटना घडली. घरी गौरव व मोठा मुलगा कॄष्णा यांची जबाबदारी भाऊ रविंद्र पाटील यांच्या कडे सोपविली होते. गौरव याचा मोठा भाऊ कॄष्णा हा घराकडे गेला असता. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.मात्र तो आतून बंद दिसल्याने त्याने काका रविंद्र पाटील यांना सांगितले. यांनी घराकडे धाव घेत दरवाजा तोडून आत बघितल्यावर गौरव हा छताला लटकलेल्या अवस्थेत दिसला. व थक्क झाले. याबाबत घटनेची संपूर्ण परिसरात झाली ओरड झाली. या घटनेचा दहिगाव पोलिस पाटील व विकास कोमलसिंग पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली. पाचोरा ग्रामिण रुग्णालयात. शवविच्छेदन करून दहिगाव संत येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. अशी माहिती पोलिस पाटील यांनी दिली. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.नि किसनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. सचिन पवार हे करीत आहेत. या दुदैवी घटनेने दहिगाव सह संपूर्ण परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.


