अमळनेर : पोलीस वृत्त – दारूच्या नशेत रस्त्यावर झोपून राहिल्यावर डोक्यारून वाहनांचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २३ रोजी सकाळी आठ वाजता मिळुस्लिम कब्रस्थान जवळ निदर्शनास आली.*
रियाजोद्दीन शेख याच्या विटा भट्टीवर लक्ष्मण नावाचा एक इसम (पूर्ण नाव माहीत नाही ) दोन महिन्यांपासून काम करत होता. त्याचे नातेवाईक अथवा परिवार नसल्याने तो मुस्लिम कब्रस्थानच्या पुढे बर्फाच्या बंद कारखान्यात राहत होता. त्याला दारूची सवय होती. २३ रोजी तो कब्रस्थान रस्त्यावर मृत अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्यातून रक्त सांडलेले दिसत होते. जवळच वाहनांचे चाक गेल्याचे दिसून आल्याने वाहनाच्या चाकाखाली त्याच्या डोक्याचा चेंदा मेंदा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.




