• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home आणखी

महाजन कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी : दशक्रियेत शैक्षणिक उपक्रम

policevrutta by policevrutta
February 10, 2026
in आणखी, शैक्षणिक
0
महाजन कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी : दशक्रियेत शैक्षणिक उपक्रम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


अमळनेर : पोलीस वृत्त न्यूज तालुक्यातील शिरूड येथील कै. कमलबाई भिवसन महाजन यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी एक प्रेरणादायी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. वि.का.सोसायटी चेअरमन तथा माजी सरपंच बापुराव भिवसन महाजन यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी संदर्भ पुस्तके भेट देण्यात आली आहेत.
सदर पुस्तकांचे वितरण आज दशक्रिया विधीच्या दिवशी करण्यात आले. कै. कमलबाई महाजन यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्याचा हा समाजोपयोगी प्रयत्न मानला जात आहे. ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध व्हावी, त्यांना अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी मागे राहू नये, या उदात्त हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला.

कै. कमलबाई महाजन या बापुराव महाजन यांच्या मातोश्री होत. त्यांचे आयुष्य कष्टमय, संस्कारमय व कुटुंबवत्सल होते. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि त्यांच्या नावाने समाजहिताचे कार्य घडावे, या भावनेतून कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देण्याचा निर्णय  घेतला.
बापुराव महाजन हे गावातील सामाजिक, शैक्षणिक तसेच विकासात्मक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेणे, शैक्षणिक उपक्रमांना पाठबळ देणे, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविणे, ही त्यांची ओळख बनली आहे.
त्यांच्या या उपक्रमामुळे अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांमध्ये समाधान व कृतज्ञतेची भावना व्यक्त होत असून, महाजन कुटुंबियांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. दशक्रिया विधीसारख्या पारंपरिक विधीला समाजोपयोगी कार्याची जोड देत त्यांनी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड

policevrutta

policevrutta

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महाजन कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी : दशक्रियेत शैक्षणिक उपक्रम
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!