• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

सीमा–सचिनचे नाव घोटाळ्यात; ६५० कोटींचा महाघोटाळा!

policevrutta by policevrutta
September 15, 2025
in Uncategorized, राजकारण
0
सीमा–सचिनचे नाव घोटाळ्यात; ६५० कोटींचा महाघोटाळा!
0
SHARES
648
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस वृत्त ऑनलाईन न्यूज:  पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदर आणि तिचा भारतीय पती सचिन मीणा यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तब्बल ६५० कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घोटाळ्याच्या तपासात प्रवर्तन संचालनालयाने (ED) मोठा खुलासा केला आहे.
या घोटाळ्यात हवाला व्यवहार आणि शेल कंपन्यांचा जाळा सामील असल्याचे समोर आले असून सीमा आणि सचिन यांच्या नावांचा व छायाचित्रांचा गैरवापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
दरभंग्याचे सीए बंधू मास्टरमाईंड
ईडीच्या माहितीनुसार, बिहारमधील दरभंगा येथील चार्टर्ड अकाउंटंट आशुतोष झा आणि विपिन झा हे या संपूर्ण प्रकरणामागील प्रमुख सूत्रधार आहेत. त्यांनी सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या नावाने बनावट ओळखी तयार करून अरुणाचल प्रदेश सरकारकडून तब्बल ₹९९.२१ कोटी रुपयांची अफरातफर केली.
या रॅकेटनं देशभरात शेल कंपन्या स्थापन केल्या. प्रत्यक्ष व्यवहार न करता बनावट बिले तयार करण्यात आली. त्याद्वारे ITC चा बनावट लाभ घेऊन केंद्र आणि राज्य सरकारला तब्बल ₹६५० कोटी रुपयांचा तोटा पोहोचवण्यात आला. या पैशांचा मोठा हिस्सा हवाला आणि इतर बेकायदा व्यवहारांत वापरण्यात आला असल्याचा संशय आहे.
झा बंधूंवर याआधीही अशाच प्रकारच्या फसवणुकीचे आरोप आहेत. २०२४ साली अरुणाचल प्रदेश पोलिसांनी त्यांना १०० कोटी रुपयांच्या ITC घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती.
ईडीची मोठी कारवाई
११ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून ईडीने दिल्ली, हरियाणा, तमिळनाडू, तेलंगणा आणि अरुणाचल प्रदेश येथे एकाचवेळी धाडी टाकल्या. इटानगर येथील एका कार्यालयातून डिजिटल आणि कागदपत्रीय पुरावे जप्त करण्यात आले. आरोपितांची चौकशी लवकरच होणार असल्याचे संकेत आहेत.
या प्रकरणातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे सामान्य नागरिकांच्या नावांचा आणि ओळखींचा गैरवापर करण्यात आला. सीमा हैदर आणि सचिन मीणा यांसारख्या चर्चेत असलेल्या नावांचा वापर करून घोटाळा आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Previous Post

पत्रकारांची स्थिती हलाखीची–  अनिल म्हस्के

Next Post

जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा; या गावातील शेती-घरे पाण्याखाली

policevrutta

policevrutta

Next Post
जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा; या गावातील शेती-घरे पाण्याखाली

जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा; या गावातील शेती-घरे पाण्याखाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!