जळगाव पोलीस वृत्त:- एक धक्कादायक प्रकार उघळकीस आला आहे. चार दिवसापूर्वी एका महिलेने बाळाला नाल्यात फेकून दिले होते. याप्रकरणी महिलेच्या जबाबातून खळबळजनक वास्तव समोर आले आहे. बलात्कारातून बाळ जन्मल्यामुळे फेकल्याचे पिडीतेने सांगितले. याप्रकरणी कैलास गोकुळ पाटील (रा. सनफुले ता. चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ६ ऑगस्ट रोजी जवजात बालकाला फेकून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पिडीतेने नवजात बालकाला नाल्यात टाकून निघून गेली होती. लोकांच्या लक्षात आल्यानंतर बाळाला आणि मातेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलीस तपासात शेवटी धक्कादायक वास्तव समोर आले. पिडीतेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, साधरण ९ महिन्यापूर्वी (तारीख माहित नाही) संशयित आरोपी कैलास गोकुळ पाटील याने मद्याच्या नशेत पीडीतेच्या झोपडीत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला होता. त्याच्यातून तिला दिवस जाऊन गर्भवती राहिल्याने एका बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी आता बलात्कारासह अनुसूचित जाती जमाती अत्याचाराचे कलम लावण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक कुषिकेश रावले हे करीत आहेत. दरम्यान, आरोपीला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आल्याचे कळतेय.

