जळगाव: पोलीस वृत्त न्युज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहराचे अधिकृत उमेदवार डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचाराचा नारळ
शाहूनगर येथील तपस्वी हनुमान मंदिरात वाढवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ऍड जयप्रकाश बाविस्कर यांनी शुभारंभ केला.
आजचा दिवस जळगाव शहरातील लोकशाहीच्या महापर्वाचा एक अविस्मरणीय क्षण बघायला मिळाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला जळगावच्या कणखर जनतेचा उसळता प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गल्ली, प्रत्येक वाडी, वस्तीतील जनतेच्या डोळ्यांत आत्मविश्वासाची झळक, आशेची किरणं, आणि महाराष्ट्र नव्या उमेदीने घडवण्याची जिद्द दिसत होती.
डॉ. अनुज पाटील यांच्या स्वागताला ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले, अनेक बहिणींच्या ओवाळणीतून कौटुंबिक प्रेम दिसलं. सोबत असलेल्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याने लोकांच्या मनात नव्या जोमाची आणि परिवर्तनाच्या आशेची ज्योत प्रज्वलित केली.
जनतेचे हे प्रेम म्हणजे फक्त उमेदवारावरचा विश्वास नसून, ते एक संकल्प आहे. जळगावच्या उज्ज्वल भविष्याचा.


