अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – तालुक्यात ग्रामीण भागात दारूचा महापूर आला आहे शहरी भागातील पाऊले आता ग्रामीण भागाकडे वळली असून २०० रुपयाची कॉटर न घेता २० रूयात १ ग्लासच्या गावठी पॅक वर जोर सुरु आहे. मात्र लग्न सराईत याला देखील जास्त भाव देऊन मिळवावी लागते.
अमळनेर तालुक्यातील शिरुड गावात सर्रास पणे दारू विक्री होत आहे मात्र विक्रेत्याना कोणाचीही भीती नाही. त्या मुळे गावात गावातील तरुण व्यसनाच्या अधीन होत आहे. पिणाऱ्यांची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे. अनेकांचे संसार या दारूमुळे उद्धवस्त झाले आहेत. गावातील हातभट्टी दारू तयार करून बिनधास्त पणे विकली जाते. त्या मुळे बरेच तरुण नशेच्या अधिन झाले आहेत. मात्र या सर्रास दारु वेक्रेत्यांनवर कारवाही का होत नाही. या दारु वेक्रेत्यांन मागे कोणाचा हात आहे. या बाबतचा प्रश्न उपस्थित आहे. या वर तात्काळ कारवाही करावी असे वरिष्ठांनाकडून बोलले जात आहे.


