पोलीस वृत्त (न्युज नेटवर्क) शिवसेना खासदार (Sanjay Raut)संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडी त्यांची चौकशी करण्याची शक्यता असून राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

यापूर्वीच संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील जमीन जप्त केली आहे.
या आधीही पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. मागील आठवड्यात २ वेळा ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र संसदेचं अधिवेशन सुरु असल्याचे कारण देत संजय राऊतांनी चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. मात्र आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.

