जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत असून एका रेल्वे कर्मचाऱ्याने अख्ख्या कुटुंबाला संपवल्याची घटना घडली आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) शहरात कौटुंबिक कलहातून रेल्वे कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीसह वृध्द आईचा खून (Murder) केल्याच्या घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे. त्याचबरोबर संशयिताने मेव्हण्यावर देखील वार केले असून तो गंभीर जखमी झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरातून धक्का देणारी ही घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. पत्नी आणि आई झोपेत असताना लोखंडी वस्तूने वार करत तरुणाने दोघांचा खून केला आहे. आराध्या हेमंत भूषण असे मयत पत्नी तर सुशीलादेवी भूषण(sushiladevi Bhushan) असे मयत वृद्ध आईचे नाव आहे. या घटनेत संशयिताने त्याच्या शालकावर सुद्धा वार केले असून तो जखमी आहे, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संशयित 32 वर्षीय हेमंत भूषण श्रवणकुमार यास पोलिसांनी अटक केली आहे.
भुसावळ शहरातील संशयित हेमंत हा रेल्वे कर्मचारी असून आराध्या सोबत हेमंत यांचं 2 डिसेंबर 2022 रोजी लग्न झालं होतं. ती त्याला आवडत नसल्याने कुटुंबात वाद सुरू होते. याच वादातून रेल्वे कर्मचारी हेमंत याने मंगळवारी पहाटे झोपेत असलेल्या त्याची पत्नी आराध्या आणि आई सुशीलादेवी यांच्या डोक्यात तसेच तोंडावर घरातील लोखंडी तवा मारला. या घटनेत आराध्या आणि सुशीलादेवी या दोघांचा मृत्यू झाला आहे.(Both Aaradhya and Sushiladevi have died in the incident.)
जखमी मेव्हण्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या घटनेने परिसर हादरला घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम राजकुमार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये आणि बाजारपेठ कर्मचारी घटनास्थळी दाखल असून त्यांच्याकडून खुनाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. घटनेनंतर आरोपी हेमंत श्रवण कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे.