पाळधी ता धरणगाव – जळगाव येथून निघालेली दिंडी ही पाळधी गावाच्या जवळून जात असतांना दिंडीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. यात दिंडीतील काही भाविक जखमी झाले. दरम्यान, पाळधी गावात याची माहिती मिळताच दुसऱ्या बाजूने देखील दगडफेक करण्यात आली. यामुळे येथे एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.(This created an atmosphere of confusion here.)

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्रातून पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला(A police team reached the spot) रात्री उशीरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर, या धुमश्चक्रीत काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

