• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

खळ्याला आग : शेतीच्या साहित्यासह ३ गुरे ठार !

policevrutta by policevrutta
February 24, 2023
in क्राईम, जळगाव
0
खळ्याला आग : शेतीच्या साहित्यासह ३ गुरे ठार !
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रावेर : प्रतिनिधी

अहिरवाडी येथील बहिरमबाबा परिसरातील खळवाडीत योगेश व रामदास दगडू धनगर यांच्या मालकीच्या खळ्याला २२ फेब्रुवारी रोजी रात्री लागलेल्या अकस्मात आगीत दावणीला बांधलेले एक बैल, दोन पारड्डू भस्मसात होऊन जागीच ठार झाल्याची तर एक गोन्हा आगीत होरपळून गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

या आगीच्या भक्ष्यस्थानी शेतकऱ्यांनी पोखरा योजनेंतर्गत शेतात पाइपलाइन करण्यासाठी खरेदी केलेले पीव्हीसी पाइप, कूपनलिकेचे फायबर केसिंग पाइप, मोटारपंप व गुरांचा चारा जळून भस्मसात झाला. याबाबत खानापूर महसूल मंडळाधिकारी विठोबा पाटील यांनी पंचनामा केला आहे.

या खळ्याला २२ फेब्रुवारीच्या रात्री आग लागून धुराच्या लोटांसह आगडोंब आकाशात उसळू लागताच आग विझवण्यासाठी सारा गाव हातात मिळेल ते पाण्याची साधने घेऊन घटनास्थळी दाखल झाला. या भीषण आगीने रौद्र रूप धारण केल्याने त्यात दावणीला बांधून ठेवलेले एक बैल व म्हशीचे दोन मोठे पारडू आगीच्या भक्ष्यस्थानी ठार झाले. तर एक गोन्हा भाजल्याने जखमी झाला. काही युवकांनी या आगीत उडी घेऊन एक बैलजोडी सोडून त्यांचे प्राण वाचवले. या भीषण आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
रावेर न. पा. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. दरम्यान, पशुधन विकास अधिकारी डॉ. अभिजित डावरे यांनी जनावरांवर रात्री तातडीने औषधोपचार केले.

Previous Post

अल्पवयीन विवाहितेस पतीने केले गर्भवती

Next Post

हुज्जत घालणे पडले महागात ; एस.टी.चालक थेट निलंबित !

policevrutta

policevrutta

Next Post
हुज्जत घालणे पडले महागात ; एस.टी.चालक थेट निलंबित !

हुज्जत घालणे पडले महागात ; एस.टी.चालक थेट निलंबित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!