• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावात मनसेचे अनोखे आंदोलन प्रतिकात्मक रूग्ण उतरवले रस्त्यावर

policevrutta by policevrutta
October 12, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात मनसेचे अनोखे आंदोलन प्रतिकात्मक रूग्ण उतरवले रस्त्यावर
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : शहरातील बेंडाळे चौक ते पांडे डेअरी चौक दरम्यानचा रस्ता दुरूस्ती करावा, या मागणी बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मनसेच्या वतीने प्रतिकात्मक रूग्ण रस्त्यावर उतरून अनोखे आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसात रस्ता दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समोरील रस्ता म्हणजेच बेंडाळे चौक ते पांडे डेअरी चौक दरम्यानचा हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर पायी चालणे देखील कठीण झाले आहे. वारंवार महानगरपालिका प्रशासनाला निवेदन, आंदोलन करून देखील कोणत्याही प्रकारची रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. हा रस्ता रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे. या खड्ड्यांमुळे रुग्णांना यातना सहन कराव्या लागतात. बऱ्याच वर्षांपासून हा रस्ता खराब झाल्यामुळे महापालिका प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून ठेकेदारालाही पाठीशी घालत आहे. या अनुषंगाने बुधवार १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रतिकारात्मक रुग्ण बनून रस्त्यावर चालून आंदोलन करण्यात आले. या रस्त्याचे काम येत्या ८ दिवसात सुरू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयातील खरेखूरे रुग्ण रस्त्यावर आणून आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलन प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, उपशहराध्यक्ष अशीष सपकाळे, सचिव जितेंद्र करोसिया, सचिव दिलीप सुरवाडे, रज्जाक सय्यद, संदीप पाटील, अविनाश पाटील, संदीप मांडोळे, ललित शर्मा, सोनू जाधव, राजीव डोंगरे, दीपक राठोड, विशाल सोनट, अक्षय चौधरी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

Big Breaking : जळगाव गोलाणी मार्केटजवळ कुंटनखान्यावर छापा, ६ महिलांसह २ पुरुष ताब्यात

Next Post

अनुभूती स्कूल ला ‘एज्युकेशन वर्ल्ड्स इंडिया स्कूल अवॉर्ड’ ईडब्ल्यू इंडिया स्कूल रॅंकिंगमध्ये भारतात टॉप 5 तर महाराष्ट्रात प्रथम

policevrutta

policevrutta

Next Post
अनुभूती स्कूल ला ‘एज्युकेशन वर्ल्ड्स इंडिया स्कूल अवॉर्ड’ ईडब्ल्यू इंडिया स्कूल रॅंकिंगमध्ये भारतात टॉप 5 तर महाराष्ट्रात प्रथम

अनुभूती स्कूल ला ‘एज्युकेशन वर्ल्ड्स इंडिया स्कूल अवॉर्ड’ ईडब्ल्यू इंडिया स्कूल रॅंकिंगमध्ये भारतात टॉप 5 तर महाराष्ट्रात प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!