जळगाव:- अभिनव शाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गणपतीची आरती रेहान अलीकडून शाळेला विठ्ठल-रूक्मिणीची पाषाणातील प्रतिमा भेट
“भारतात अनेक जाती-धर्म आहेत. पण या सर्वांना एकत्र बांधणारा धागा हा भारतीयत्वाचा आहे. मुस्लिम विद्यार्थी आयान याने उत्सवासाठी गणेशाची मूर्ती देऊन तोच धागा बळकट केला, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज केले.
अभिनव विद्यालयात आयान खान या विद्यार्थ्याने दिलेल्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या गणेशाची आरती आज श्री. राऊत यांच्या हस्ते झाली. आज शिक्षकदिनानिमित्ताने शिक्षक दिनानिमित्त रेहान अली रजाक अली सय्यद याच्या पालकांनी शाळेस दगडी पाषाणातील विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली .
श्री. राऊत यांनी आयान खान पठाण व रेहान अली रजा अली सय्यद यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक सौ. सरोज तिवारी यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षक संतोष सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे अध्यक्ष श्याम भाऊ कोगटा उपाध्यक्ष संजय बिर्ला, शालेय समिती चेअरमन विनोद बियाणी, मुख्याध्यापक हेमंत पाटील व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.