• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

खोटे नाव सांगून केली मैत्री, ब्लॅकमेल करून केला अत्याचार! जळगावातील धक्कादायक प्रकार

policevrutta by policevrutta
August 14, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खोटे नाव सांगून केली मैत्री, ब्लॅकमेल करून केला अत्याचार! जळगावातील धक्कादायक प्रकार
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन जळगाव जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत असताना पुन्हा एक घटनेने जळगाव शहर पुन्हा हादरले आहे. साक्री येथील रहिवासी असलेला एक विद्यार्थी जळगावात नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. खोटे नाव सांगून त्याने एका विद्यार्थिनीसोबत मैत्री केली नंतर तिच्यासोबत काही फोटो काढले. भेटायला न आल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान शब्बीर मन्यार आणि इकबाल शेख अशी संशयितांची नावे आहेत.

या बाबत अधिक महिती अशी की जळगाव शहरातील एका नामांकित महाविद्यालयात एक २० वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. एप्रिल २०२२ मध्ये महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये बसलेले असताना विद्यार्थिनीची एका विद्यार्थ्याशी ओळख झाली. तरुणाने स्वतःचे नाव जॅक उर्फ सागर सोनवणे रा.साक्री, ता.धुळे असे सांगितले. सिनियर असल्याने दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले. काही दिवसांनी दोघे इंस्टाग्रामला भेटले असता तरुणाचे नाव इमू मन्यार असल्याचे तिला दिसले. तरुणीने याबाबत विचारणा केली असता मुस्लीम मुलांशी मुली बोलत नाही, म्हणून नाव खोटे सांगितले असे तो म्हणाला. तसेच स्वतःचे नाव इम्रान शब्बीर मन्यार असल्याचे त्याने सांगितले.

महाविद्यालय प्रोजेक्ट आणि इतर शैक्षणिक कामानिमित्त दोघे भेटत असताना त्याने विद्यार्थिनीसोबत सेल्फी काढले. जून – जुलै २०२२ मध्ये प्रोजेक्टच्या कामानिमित्त इम्रानने विद्यार्थिनीला तो राहत असलेल्या रामानंद नगर स्टॉप जवळील खोलीवर बोलाविले. त्याठिकाणी असलेल्या इम्रानचा मित्र इक्बाल याच्यासोबत ओळख करून दिल्यावर तो निघून गेला. काही वेळाने इम्रानने विद्यार्थिनीसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न करीत सेल्फी काढले. विद्यार्थिनीने ते डिलीट करण्याचे सांगितले असता त्याने काही होत नाही म्हणून नकार दिला.

तीन दिवसांनी पुन्हा त्याने विद्यार्थिनींना फोन करून भेटण्यास बोलाविले. तिने नकार दिला असता त्याने फोटो आई – वडील, मित्र मैत्रिणींना आणि इतरत्र व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलगी भेटायला गेली असता त्याने जबरदस्ती तिच्यावर अत्याचार केला. ऑगस्ट – सप्टेंबर २०२२ मध्ये पुन्हा त्याने मुलीला फोन करून अजिंठा चौफुली जवळील एका हॉटेलवर भेटण्यास बोलाविले. मुलीने नकार दिला असता गेल्यावेळी आपल्या संबंधांचे फोटो माझा मित्र इकबाल याने काढले असून ते त्याने दाखविले. तेव्हा देखील त्याने विद्यार्थिनीवर अत्याचार केला. हळूहळू विद्यार्थिनीने त्याच्याशी संबंध तोडत त्याचा क्रमांक ब्लॉक केला. तरी देखील त्याने इतर क्रमांकावरून त्रास देणे सुरूच ठेवले होते.

तू माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी तो नेहमी धमकी देत होता. १३ ऑगस्ट २०२३ पासून त्याने पुन्हा फोटो, मेसेज करून धमकविण्यास सुरुवात केली. त्रास असह्य झाल्याने तरुणीने घडलेला प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने तिच्या भावाला प्रकार सांगितल्यावर प्रकार उघड झाला आणि रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामानंद नगर पोलिसात रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलिसात इमरान शब्बीर मन्यार रा.साक्री ता.धुळे, इक्बाल खान रा.परभणी दोघे ह.मु. आदर्श नगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी ३ ते ४ मुली पीडित असण्याची शक्यता व्यक्त होत असून इम्रान याच्याकडून ४ मोबाईल, एक लॅपटॉप हस्तगत केला असल्याची माहिती आहे.

Previous Post

धक्कादायक! ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत 17 जणांचा मृत्यू

Next Post

‘तिरंगा’ हे नाव भारतीय राष्ट्रध्वजाला कसे पडले माहितीये? वाचा सविस्तर

policevrutta

policevrutta

Next Post
‘तिरंगा’ हे नाव भारतीय राष्ट्रध्वजाला कसे पडले माहितीये? वाचा सविस्तर

'तिरंगा' हे नाव भारतीय राष्ट्रध्वजाला कसे पडले माहितीये? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!