अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– ग्राम विकास संस्था मुडी पुन्हा चर्चेत आली आहे. व्यवस्थापक मंडळाच्या सन २०२३-२८ या पंचवार्षिक निवडणुक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निरीक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय जळगाव यांनी जाहीर केली . त्यात सुमारे चारशे आजीव सभासद वाढविण्यात आली. काहीतर अल्पवयीन मुले आहेत. अल्पवयीन मतदार वाढवणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लीहलेल्या घटनेचा अवमान जणू व्यवस्थापक मंडळ व संबधीत अधिकाऱ्यांनी केला असे वाटत नाही का? सन २०१९-२० मध्ये हे आजीव सभासद वाढवली त्या वेळेस करोनाचा प्रदूर्भाव होता. त्यावेळी यांना कोणत्या सक्षम अधिकाऱ्यांनी जनरल सभा घ्यायला परवानगी दिली ?ऑनलाईन सभा घेतली असेल तर रेकॉर्डिंग व व्हिडिओ जिल्हा न्यास कार्यालयाला सादर केले काय ? अंधळे दळते आणि कुत्रे पिठं खाते असा प्रकार झाला . व्यवस्थापक मंडळ व वरिष्ठ कार्यालयाच्या मनमानी करभाराला संस्थेच्या सात ही गावातून जनमानसात उद्रेक पहाव्याला मिळत आहे. वरील असे भरपूर अनुचित प्रकार घडले यात कुठला वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत आहे की काय अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. प्राथमिक मतदार यादी वर भरपूर अक्षेपाचा पाऊस पडला. आज पर्थामिक मतदार यादीवर अंतिम निर्णय आहे . न्याय देवता काय न्याय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.’तर आम्हाला आमच्या मुलांचे दाखले द्या! शाळेत जाऊन पालकांची मागणी
ग्रामविकास शिक्षण संस्था मडी येथील सभासद यादी बाबतचे पडसाद चांगले उमटले असुन गावातील पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट ओसरली असून याबाबत शिरूड गावातील अनेक पालकांनी थेट शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली आहे. तर शाळेतील तहयात संचालकांना या ठिकाणी बोलवा अन्यथा आम्हाला आमच्या मुलांचे दाखले द्या! अशी मागणी थेट पालकांनी मुख्याध्यापकांकडे केलेले आहे. मुख्याध्यापकांनी थेट तहयात संचालकांची संपर्क साधला तर या प्रकारा बाबत तक्रार आल्याचे संगीलते संचालक काहीतरी कामात असल्याने आता येणे शक्य होणार नाही असे त्यांनी सांगितले. तर सभासद यादी बाबतचे पडसाद हे शाळेत चांगलेच उमटणार असे पालकांनी मुख्याध्यापकांना सांगितले तर याबाबतचा निरोप तक्रार आपण वरिष्ठांपर्यंत कळवावी असे पालकांनी सांगितले. आमचाच मतदार- आमचीच खुर्ची झाली पाहिजे असे प्रत्येकाला वाटू लागले आहे. जळगाव जिल्ह्यात नावलौकिक असलेली ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी अनेक प्रकारे अनेक कारनामामुळे चर्चेत ठरत असते शिक्षणाचा बट्ट्या बोळ देखील या संस्थेत काही दिवसांपूर्वी चर्चेचा विषय ठरला होता. विद्यार्थ्यांची दशा पाहता तर अत्यंत दैनिय शिक्षणाचा आईचा घो… शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असून राजकारणाकडे लक्ष आहे. प्रत्येकाला आता खुर्चीची चांगली चाहूल लागली आहे. आमचे मतदार- आमचा चेअरमन आम्ही पुढारी झालो पाहिजे आता असे प्रत्येकालाच वाटू लागेले….
आपापसातल्या परिवारातील भरीव नावे बिन बुलाये मेहमान या सभासद नोंदणीच्या यादीत दिसून येत आहे. तर आम्ही गावातील नागरिक मरून गेलो का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे ‘तर गावात अनेक समाजातील- जाती धर्माचे लोक राहत असतात त्यांचीही मुले शाळेत शिकतात याचाही विचार संस्थेने करायला हवा. ज्यांना संस्थेबाबत ज्ञान नाही अशांची नावे यादीत ….गावात राहणारे अनेकांचे वय वर्ष संपत गेले तरी ते सभासद झाले नाही. पण यादीत अशी नावे दिसुन आली की त्या लोकांना याबाबतची कल्पना नाही आपली नावे यादीमध्ये आली कुठून संस्थेतील हे शडयंत्र कुठेतरी थांबला पाहिजे ज्या ज्या बापाचा मुलगा या शाळेत शिकत त्या बापाचा ही विचार या संस्थेने करायला हवा कारण त्याच बापाच्या मुलामुळे ही शाळा सुरू आहे. याबाबत पालकांनी सांगितले