• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

ब्रेकींग! रेल्वे तिकिट काळाबाजाराचा सापळा! सुरक्षा बलाचे केला उघडा

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 30, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
372
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जामनेर:- रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करण्यासाठी दलालास मदत करीत असलेल्या रेल्वेच्या मुख्य वाणिज्य लिपिकाला भुसावळ मंडळमधील जळगावच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून सोमवारी मध्यरात्री अटक केली आहे. सोमवारी रात्री 12 वाजता जामनेर रेल्वेस्थानकावर ही कारवाई करण्यात आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. चंद्रकांत प्रताप पाटील (वय 37, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) असे पकडल्या गेलेल्या लिपीकाचे तर सिद्धार्थ सुरेश सोनवणे (वय 25, रा. रेल्वे कॉलनी, जामनेर) असे संशयित दलालाचे नाव आहे.

चंद्रकांत पाटील याची नियुक्ती जामनेर रेल्वेस्थानकवर असून तो अनुकंपा तत्त्वावर नोकरील लागला आहे. त्याची जामनेर स्थानकावर रेल्वेचे तिकीट बुकींग काऊंटरच्या ठिकाणी नियुक्ती आहे. या ठीकाणच्या काही प्रवाशांनी जळगाव स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बलाकडे तक्रार आरक्षण उपलब्ध असूनही नकारदेण्यासह इतर बाबत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानीशा पटल्यानंतर सोमवारी रात्री भुसावळ आरपीएफचे मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, उपनिरीक्षक मनोज सोनी, परीक्षित वानखेडे, किरण पाटील, विनोद जेठवे यांच्या पथकाने साध्या गणवेशात जाऊन जामनेर रेल्वेस्थानकावर सापळा रचला. एका कर्मचाऱ्याने प्रवासी असल्याचे सोंग घेऊन आरक्षणाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

दलाल उपलब्ध होतो का? याची चौकशी केली. काही वेळातच त्यांना सिद्धार्थ सोनवणे याने प्रतिसाद देत तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी लिपीक चंद्रकांत पाटील यांची मदत सिद्धार्थ याने घेतली. ही प्रक्रीया पूर्ण होताच पथकाने चंद्रकांत पाटील याच्या दालनात प्रवेश करुन त्याला रंगेहात पकडले. यावेळी दोघांच्या ताब्यातून 68 हजार 535 रुपये मुल्य असलेले 14 रेल्वे तिकीट मिळून आले. या तिकीटांसाठी संबधित व्यक्तींकडून सिद्धार्थ याने मागणीपत्र तयार केले होते. सापळा यशस्वी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील व सिद्धार्थ सोनवणे या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील तपास करीत आहेत. दरम्यान, सिद्धार्थ याने मागणी केल्यानंतर चंद्रकांत पाटील तिकीट काढून ठेवायचा. नंतर तिकीटाचा फोटो सिद्धार्थला व्हाटसअॅपवर पाठवून नंतरच सिद्धार्थ त्याला पैसे देत होता. तसेच कमिशनचे पैसे न मिळाल्याचे चंद्रकांत पाटील संबधित तिकीट स्वत:जवळच ठेऊन घ्यायचा, अशीही माहिती सिद्धार्थने पोलिसांना चौकशी दरम्यान दिली आहे.

Previous Post

अरे बापरे…! या कारणावरून जळगावात पोलिसाच्या कानशिलात लगावली!

Next Post

जळगाव! अल्पवयीन मुलीची वेश्या व्यवसायासाठी विक्री! चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

जळगाव! अल्पवयीन मुलीची वेश्या व्यवसायासाठी विक्री! चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!